Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून चैतन्य अपंगमती विद्यालयाला शैक्षणिक साहित्य

गडहिंग्लज : येथील आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने चैतन्य अपंगमती विद्यालयाचे प्राचार्य साताप्पा कांबळे यांच्याकडे शैक्षणिक साहित्य सुपूर्द करताना पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक. यावेळी उपस्थित आगार प्रमुख गुरुनाथ रणे, व्ही. बी. कुरणे, टी. आर. राणे, एम. एस. कांबळे,  राजेंद्र सुतार, रामभाऊ पाटील, एस. एस. गुरव व इतर.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लज आगारातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने चैतन्य अपंगमती विद्यालय भडगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर साहित्य पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या हस्ते प्राचार्य साताप्पा कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.






यावेळी बाळेश नाईक व प्राचार्य साताप्पा कांबळे यांनी कर्मचाऱ्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमास आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे, लेखनिक व्ही. बी. कुरणे, टी.आर. राणे, एम. एस.कांबळे,  राजेंद्र सुतार, रामभाऊ पाटील, एस.एस.गुरव यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.