गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरात पोलिसांनी पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
पोलीस उपाधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यावरून हे पथसंंचलन करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांनी केले. समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही पोलीस उपाधीक्षक श्री नवले यांनी सांगितले.


