Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'भारतीय स्वराज सेना'तर्फे महागाव, उंबरवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप

महागाव: येथील  कन्या व कुमार विद्या मंदिरमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना कुणालसिंह हजारे, अमरसिंह महाडिक, राजकुमार कातकर, विश्वनाथ कोकितकर यांच्यासह अन्य.


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
भारतीय स्वराज सेना कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्फत राजकुमार कातकर व विश्वनाथ कोकितकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय स्वराज्य सेना कोल्हापूर जिल्हा सचिव कुणालसिंह हजारे यांच्या नेतृत्वाखाली विद्या मंदिर उंबरवाडी व कुमार व कन्या विद्या मंदिर, महागाव येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. 




शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी भारतीय स्वराज्य सेना विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमरसिंह महाडीक, तालुका अध्यक्ष  पवन कट्टीकर, प्रविण चिमणे, निहाल मुगले, श्रवण विटेकरी, आदित्य जाधव, रोहित खंडाळे, श्रीधर पाटील, महादेव नाईक, गणेश पाटील, सुभाष रेडेकर , रोहित पाटील, आनंदा रेडेकर, विक्रम सुतार,ऋषिकेश शिरगावकर, नरसिंहराव गुरव, विनायक होडगे. कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.