गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव -जरळी रस्त्यावर शनिवारी दुपारी 12च्या सुमारास मुख्य रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. सदर झाड तातडीने हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आला. सध्या तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य वसंत नाईक, कोतवाल किरण कांबळे, राम कांबळे उपस्थित होते.



