Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

व्यायामशाळांमधील समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या काही घटकांना आळा घाला

ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): व्यायाम शाळांमध्ये समाज स्वास्थ्य बिघडवणाऱ्या काही घटकांवर आळा घालण्यात यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, व्यायाम हा निरोगी जीवनासाठीचा अविभाज्य भाग आहे. त्यासाठी जागोजागी फुटलेले खासगी व्यायामशाळांचे पेव तसे गरजेचेही आहे. पण या व्यायामशाळांचे व्यवस्थापन, तेथील प्रवेश प्रक्रिया, प्रशिक्षक आणि त्यांची पात्रता, महिला आणि पुरुष यांच्या स्वतंत्र बॅचेसचे व्यस्थापन आदी अनेक बाबींवर कुणाचेही कसलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.  व्यायाम करणाऱ्या महिलांसाठी महिला प्रशिक्षक नेमल्याचे उदाहरण अपवादानेही कुठे आढळत नाही.



शहरातील सर्व व्यायामशाळांची त्वरित पाहणी करावी. प्रत्येक व्यायामशाळेमध्ये महिला आणि पुरुष यांच्या बॅचेसच्या वेळा स्वतंत्र असाव्यात. महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षकाचीच नेमणूक असावी. या बाबींचा गांभीर्याने विचार करुन तातडीने उपाययोजना राबविण्यात याव्यात आणि कौटुंबिक स्वास्थ्यासोबत समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या अशा घटकांना आळा घालावा. अन्यथा याबाबत व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे.




यावेळी सह संपर्कप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख दिलीप माने, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रतीक क्षीरसागर, आजऱ्याचे नगरसेवक संभाजी पाटील, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, लक्ष्मण मनवाडकर, दिगंबर पाटील, अर्जुन पाटील, संतोष कदम, सचिन आर्दाळकर, उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, बाळकृष्ण कडुकर, अमोल डोंगरे, अजितराव खोत, संतोष आढावकर, रोहित गोरुले, सुरेश हेब्बाळे, मारुती रक्ताडे  यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.