Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरी उर्दू विद्यामंदिर येथे विद्यार्थी कौतुक सोहळा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): नेसरी गावचे सरपंच सौ. गिरीजादेवी शिंदे नेसरीकर यांच्या दातृत्वाने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विविध स्पर्धा परीक्षा व क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत उज्वल यश संपादन करून शाळेचे नावलौकिक केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला.



यावेळी एकूण 43 विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे काम सरपंच सौ. शिंदे नेसरीकर  यांनी केली.



या प्रसंगी हायस्कूलसाठी स्वखर्चातून मुलांना बेंच उपलब्ध करून दिलेबद्दल जाकीर मिंयाभाई यांचा विशेष सत्कार करणेत आला. यासाठी डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उस्मान कदीम, व्हाइस चेअरमन शहेजाद वाटंगी, सेक्रेटरी हारून पिरजादे यांनी मोलाची साथ दिली.



कार्यक्रमास उपसरपंच प्रथमेश दळवी, ग्रा. पं.सदस्य किरण हिडदुग्गी, मुस्तफा मुजावर, सौ.रुखसार नूलकर, सौ.वंदना नांदवडेकर, मुस्लिम सुन्नत जमाअत नेसरीचे पदाधिकारी, सेक्रेटरी साबीर वाटंगी व सदस्य वसीम नूलकर, पालक वर्गातून सद्रोद्दिन माकानदार, असलम शेख, फारुक बागवान, इर्शाद मुल्ला, समीर पेंढारी, मजीद बागवान, समिउल्ला बागवान व महिला पालक उपस्थित होते.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शहेजाद वाटंगी, अल्ताफ खेडेकर, सौ.आफरीन बागवान, सौ.नेहा नूलकर, सौ आरिफा वाटंगी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.