तलाठी सौ. रुपाली कांबळे यांनी पदभार स्वीकारला
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव सजामधील तलाठी प्रल्हाद खटावकर यांची शिनोळी (ता चंदगड) येथे बदली झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथमच महिला तलाठी सौ. रुपाली कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी प्रल्हाद खटावकर यांनी आपला पदभार सौ रुपाली कांबळे याच्याकडे सोपवला. श्री. खटावकर व सौ. कांबळे यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक व ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील याच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी कृषी सहायक अनिल कांबळे, सौ रेशमा कुंभार, किरण गुरव, राजकुमार बंदी, अरुण कांबळे, उदय आरगळी, सुनिल मरदानी उपस्थित होते.


