Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'शिवराज'चा कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉ. सुधीर मुंज तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार रामचंद्र वडर यांना जाहीर

दि.२ जानेवारी रोजी पार पडणार कार्यक्रम




गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलामार्फत थोर समाजसेवक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनी दि.२ जानेवारी २०२४ रोजी देण्यात येणारा 'कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार' पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज यांना तर कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार' प्रयोगशाळा परिचर रामचंद्र वडर यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार दै. 'लोकमत'चे संपादक डॉ. वसंत भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे भूषविणार आहेत. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी दिली.


जाहीर व्याख्यानाचेही आयोजन


येथील शिवराज महाविद्यालयाच्या प्रांगणात दि. २ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दै. 'लोकमत' चे संपादक डॉ. वसंत भोसले यांचे 'देशासमोरील आव्हाने आणि तरुणाई' या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी 'कर्मवीर गुणवंत शिक्षक व कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार' वितरण तसेच महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. जे. वाय. बारदेस्कर, के. जी. पाटील, अॅड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी माजी विद्यार्थी पंडित पाटील (गडहिंग्लज हायस्कूल), जे. डी. पाटील (भैरवनाथ हायस्कूल बड्याचीवाडी), सौ. कल्पना बी. पाटील (राजाभाऊ केसरकर हायस्कूल, निगुडगे), श्रीमती आर.ए. शेख (न्यू इंग्लिश स्कूल, चन्नेकुप्पी),  ए.व्ही. देशमाने (नौकुडकर हायस्कूल, मुंगुरवाडी),  व्ही. व्ही. गुरबे (महात्मा फुले हायस्कूल, बटकणंगले),  ए.जी. कुलकर्णी (महात्मा गांधी हायस्कूल, नरेवाडी),  एस.एस. कांबळे (वसंतदादा विद्यालय, उत्तूर),  एस.बी. देऊस्कर (छत्रपती शिवाजी विद्यालय, व्होन्याळी),  दत्ता परीट (गिजवणे हायस्कूल, गिंजवणे) या निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, ग्रंथपाल प्रा. संदीप कुराडे,  प्रा. विश्वजित कुराडे व कार्यक्रम समिती करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.