Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाकडेही लक्ष द्यावे : पत्रकार अमानुल्ला मालदार

हलकर्णी येथील बी.एम.टोणपी मराठी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन   




हलकर्णी (वार्ताहर):  स्पर्धात्मक युगात क्रीडा क्षेत्रात आपल्या शाळेबरोबरच आपले आई-वडील शिक्षकांचा नावलौकिक करा. केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता मन,  मनगट आणि मस्तकाची मशागत करणाऱ्या खेळाकडे सुद्धा लक्ष द्यावे असे प्रतिपादन पत्रकार अमानुल्ला मालदार यांनी केले.



गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील बी.एम.टोणपी मराठी विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आप्पासाहेब टोणपी होते.



प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंद पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले.





यावेळी बोलताना प्रसाद जोशी म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. सकस आहार सेवन करावे. या विद्यालयाचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचले पाहिजेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देश सेवेसह कराटे व अन्य स्पर्धेत नावलौकिक मिळवलेला आहे.




यावेळी दीपक लुगारे ,भीमराव रवेदार, हलकर्णी शाळेचे मुख्याध्यापक आनंद पाटील ,बसर्गे शाळेचे मुख्याध्यापक परशुराम वाके, एस. बी. भोसले, आर. ए. चिकबसर्गे यांच्यासह बसर्गे, हलकर्णी येथील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.