गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात प्रशासकीय कर्मचारी शिवाजी कुरळे व पांडुरंग नडगेरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न झाला, अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून के.डी.सी. चे संचालक संतोष पाटील, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब पाटील, माजी प्रबंधक बी. एस. मोहिते यांची उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात पांडुरंग नडगेरी यांचा के. डी. सी. चे संचालक संतोष पाटील यांच्या हस्ते, शिवाजी कुरळे यांचा माजी प्रबंधक बी. एस. मोहिते यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे संतोष पाटील, कॅप्टन रावसाहेब पाटील, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम, बी.एस. मोहिते, ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. रंगराव हेंडगे, प्रबंधक डॉ. संतोष शहापूरकर यांनी आदींनी आपल्या मनोगतातून या दोन्ही सेवानिवृत्त सेवकांच्या कार्याचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिलराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयात शिवाजी कुरळे, पांडुरंग नडगेरी यांनी कार्यतत्पर राहून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. त्यानी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यामुळे शिवराज विद्या संकुल ज्ञानदानाच्या कार्यात समाजासाठी आजही तत्पर कार्य करीत आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त करून त्यांनी दोन्ही सेवानिवृत्तांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शिवाजी कुरळे व पांडुरंग नडगेरी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, प्रा. विक्रम शिंदे, कुरळे व नडगेरी कुटुंबीय, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. आभार डॉ. अशोक मोरमारे यांनी मानले. वंदे मातरम या गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




