Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या सावित्रीबाई फुले वि‌द्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

                         सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


स्पर्धेचे उद्‌घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बालवाडी ते ७ वी पर्यंतच्या ५२ स्पर्धकानी सहभाग नोंदवला.


फॅन्सी ड्रेसच्या माध्यमातून जलव्यवस्थापन,  माझी वसुंधरा, स्वच्छता अभियान मोहिम, चांद्रयान मोहीम या विषयांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.


स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -

बालवाडी - प्रथम ओवी गुंजाटी, द्वितीय श्लोक गुंजाटी, तृतीय सान्वी परीट  


इयत्ता पहिली : प्रथम मैथिली परीट, द्वितीय श्रद्धा रिजीकणावर, तृतीय प्रणिता नाईक  


इयत्ता दुसरी : प्रथम सृष्टी ऐवाळे, द्वितीय संस्कार मोहिते, तृतीय कार्तिक चिलीमी, उत्तेजनार्थ श्रावणी सननाईक


इयत्ता तिसरी: प्रथम सोनाक्षी मोहिते, द्वितीय सर्वेश डवरी, तृतीय आराध्या पाटील


इयत्ता चौथी: प्रथम प्रबुद्ध कांबळे, द्वितीय स्वरा साळुंखे, तृतीय वेदिका कुंभार


इयत्ता पाचवी : प्रथम जान्हवी इंगवले,   द्वितीय  जान्हवी गोरे, तृतीय समीक्षा कुंभार 


इयत्ता सहावी : प्रथम सान्वी कुलकर्णी, द्वितीय पायल मोहिते, तृतीय प्रगती कांबळे


इयत्ता सातवी: प्रथम गायत्री चव्हाण, द्वितीय गणेश सुतार, तृतीय राधिका मगदूम


सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. मीनाक्षी शिरगावे, भगवंत कांबळे, अनिल खोपकर, रेश्मा नेवडे, विद्या पुजारी, जयवंती जाधव, मुख्याध्यापक विठ्ठल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.