गडहिंग्लज (प्रतिनिधी): जयपुर राजस्थान येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने पिरॅमिड प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सहा मुलींच्या संघामध्ये शिवराज महाविद्यालयाच्या समीक्षा गावडे आणि प्राजक्ता गावडे यांनी सुवर्णपदक पटकाविले. या दोन्ही खेळाडूंनी शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदक मिळवून देण्यात उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे. त्यांच्या या धवल यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या खेळाडूंना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

