Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गट- तट न मानता एकत्र, हाच बसर्गे गावचा खरा आदर्श : आमदार राजेश पाटील

बसर्गे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 




हलकर्णी (वार्ताहर):  पूर्व भागात विकास कामांचे माहेर घर म्हणून बसर्गेला ओळखले जाते. गावातील राजकीय ईर्षा व गट -तट बाजूला ठेवून गावच्या सर्वांगीण विकासकामासाठी एकत्र येता हाच खरा आदर्श आहे. स्व. सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, नरसिंगराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत परिसरातील सर्व गावांच्या वाडी वस्तीतील खरी वस्तूस्थिती पाहून जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणाने करत आहे. २०१९ मध्ये स्व. बाबासाहेब कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर व सर्व शिलेदारांच्या पाठबळामुळे मी आमदार झालो. माझ्या विजयामध्ये पूर्व भागातील जनतेचा पाठिंबाही तितकाच महत्वपुर्ण आहे असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.



बसर्गे -नूल पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण व बसर्गे- इदरगुची रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक शिवानंद घस्ती यांनी केले.




यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील भागोजी कागिणकर, जयसिंग चव्हाण, राजेश पाटील औरनाळकर, माजी जि.प.सदस्य जयकुमार मुन्नोळी, संतोष पाटील, निखत मुल्ला यांची भाषणे झाली. यावेळी १ कोटी ८१ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. या कार्यक्रमांस बाबासाहेब पाटील मुगळीकर, महाबळेश्वर चौगुले, विकी कोणकेरी, दीपक पुजारी, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, मुन्नासो नाईकवाडी, अमर हिडदुगी, सरपंच भारती रायमाने, उपसरपंच बसवराज कापसे, सातगोंडा जिनान्नावर, चंद्रशेखर पाटील, वसंतराव चौगुले, विरूपाक्ष घुळाणावर, श्रीपतराव चौगुले, युवराज शिंदे, सुरेश गवानी, ग्रामविकास अधिकारी पी.बी.पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुतापा जोडगुद्री यांनी सूत्रसंचालन केले. बबन पाटोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन  सुशांत नौकुडकर, प्रसाद जोशी, शिवकुमार संसुदी, सागर शिंदे, रामगोंडा जिनानावर यांनी केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.