गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असताना जॅकवेलकडुन येणारी मेन पाईप लाईन आजरा रोड येथे फुटली आहे. सदर ठिकाणी दुरुस्तीची कामे करावयाची असल्याने शनिवार दिनांक 06 रोजी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

