Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ध्येय निश्चित करून प्रयत्न केल्यास यश निश्चित: शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शालेय वयात आपल्याला काय व्हायचे हे निश्चित करून वाटचाल केले पाहिजे. समोर कर्तृत्ववान व्यक्तींचे आदर्श ठेवणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या विद्यार्थ्यांची संगत करा. शालेय जीवनात ध्येय निश्चित करून प्रयत्न केल्यास यश प्राप्ती निश्चितपणे होते. असे प्रतिपादन माध्यामिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले.




महागाव (ता.गडहिंग्लज) येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये शाळा तपासणीच्या निमित्ताने विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस. पाटील होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.




शिक्षणाधिकारी श्री. आंबोकर पुढे म्हणाले, वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यामुळे आतापासून चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. असे सांगत शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक सूचना केल्या. प्रास्ताविक प्रा. पी.डी. पाटील यांनी केले.




सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी तर आभार सुभाष सुतार यांनी मानले. यावेळी संस्था प्रतिनिधी डी.एस. पाटील, आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे, प्रा. रसूल सोलापुरे,अशोक नांदूलकर, अनिल हलकर्णी, रविंद्र पाटील,एस. एल.लोहार, रावसाहेब मुरगी, जी.पी. वस्ट, रमेश कांबळे, पवन सूर्यवंशी, रविंद्र  कबुरी, सादिक हावळे, महेश पाटील, संदेश कोकितकर, कुलदीप देसाई, रमेश कळविकट्टे,एकता पाटील, किरण पाटील, शांताराम वागराळीकर, शिवाजी सुतार, नरसू कांबळे यांच्यासह शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.