Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांनी सादर केला कलाविष्कार

                               सर्व छायाचित्रे  : मज्जीद किल्लेदार, गडहिंग्लज 
                 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या सावित्रीबाई फुले विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण केले. एकूण 26 वेगवेगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले.




येथील शिवाजी चौक परिसरात सदर वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाटील होते. कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रमेश कोरवी यांनी केले.




गणेश वंदना, लोकगीते, राष्ट्रभक्तीपर गीते, विविध भाषांमधील गीते यांचा समावेश या कार्यक्रमात होता. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. याप्रसंगी प्रकाश मगदूम, संतराम कुंभार, मंगल इंगवले, सायरा गायकवाड, सुजाता कुंभार, सतीश डवरी, आक्काताई म्हेत्री यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.



मुख्याध्यापक विठ्ठल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ मीनाक्षी शिरगावे, अनिल खोपकर, संदीप बाबर, रेश्मा नेवडे, भारती कुंभार, जयवंती जाधव यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन भगवंता कांबळे व सौ. विद्या पुजारी यांनी केले.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.