विविध पशु, पक्षी व प्राणी ठरतायेत सर्वांचे आकर्षण
सर्व छायाचित्रे: मज्जिद किल्लेदार, गडहिंग्लज
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे राज डावरे यांनी आयोजित केलेल्या संजीवनी कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. या प्रदर्शनात हरियाणा मुऱ्हा जातीचा दीड लाख रुपये किमतीचा रेडा, अमेरिकन कोंबडी, टर्की कोंबडा, कडकनाथ चिनी कोंबडी, फायटर कोंबडा, ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडा, गिरीराज कोंबडा असे विविध पशु, पक्षी प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहेत. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रदर्शनाचे पाहुयात छायावृत्त.....












