Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात अयोध्येहुन आलेल्या अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  "जय श्रीराम" च्या जयघोषात अयोध्येहून आणलेल्या अक्षता कलशाची महागाव येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जागोजागी भगवे ध्वज लावून रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. महागावतील पाच रस्ता येथून सुरुवात होऊन महाकाली मंदिर येथे सांगता झाली. या यात्रेत  झांज, लेझीम पथक,भजनी मंडळ यांच्या आवाजाने वातावरण भक्तीमय झाले होते.



पाच रस्ता येथे अक्षताकलशाचे आयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्यात प्रत्यक्ष सहभाग असणारे गंगाराम पाटील यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. यावेळी सुहासिनी महिलांनी अमृत कलशाचे पूजन केले. या शोभायात्रेत महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री शिवाजी विद्यालय, ब्रह्मदेव कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ उंबरवाडी येथील झांज पथक, महागावातील विविध भजनी मंडळे यांच्या आवाजात जय श्रीरामचा जयघोष करत सदर शोभायात्रा मरगुबाई मंदिर, खवरे हॉटेल, श्री.शिवाजी चौक, महादेव मंदिर, पेठ गल्ली मार्गे महाकाली मंदिरात सांगता झाली.



यावेळी भडगावातील समर्थनगर मठाचे मठाधिपती परमपूज्य किसन महाराज, मिरज येथील परमपूज्य कौस्तुभ महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी कौस्तुभ महाराजांनी रामभक्तांना मार्गदर्शन केले. हा अक्षताकलश महाकाली मंदिरात रामभक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.



यावेळी महागाव ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत  सदस्य,आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन व आजी माजी पोलीस संघटनेचे पदाधिकारी, भटजी यांच्यासह रामभक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.