Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या मराठी विद्यामंदिर शाळेचा गडहिंग्लज तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धेत डंका

कु. चाहत बाबासाहेब गंधनवाले हिने मिळविले तिहेरी यश


चाहत गंधनवाले व कौस्तुभ कतिगार या दोन खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नुल येथे दिनांक 4 व 5 जानेवारी रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारात तेरणीच्या मराठी विद्या मंदिर शाळेने उज्ज्वल यश संपादन केले.




या स्पर्धेतील वरीष्ठ गटात कु. चाहत बाबासाहेब गंधनवाले हिने 100 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक, लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक, उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. तीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.




सांघिक क्रिडा प्रकारातील खो-खो स्पर्धेत मुलांच्या लहान गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

कौस्तुभ करवीर कतिगार याने 50 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कु.करूणा शिवाजी कांबळे हिने 100 मीटर धावणेमध्ये तृतीय क्रमांक, उंच उडीमध्ये कनिष्ठ गटातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.



कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक क्रिडा स्पर्धेसाठी मराठी वि.मं.तेरणी शाळेच्या कु.चाहत बाबासाहेब गंधनवाले व कौस्तुभ करवीर कतिगार  या दोन खेळाडूंना चार क्रिडा प्रकारात गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.