अत्याळ, नांगनूर, तनवडी, हणमंतवाडी ग्रामपंचायतींचा समावेश
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ, नांगनूर, तनवडी, हणमंतवाडी या चार ग्रामपंचायतींचे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. या चारही ग्रामपंचायतींची मुदत २७ जानेवारी रोजी संपली आहे. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरक्षण काढण्यात आले.
ग्रामपंचायत निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे - अत्याळ : प्रभाग एक सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री.
नांगनूर : प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण.
तनवडी : प्रभाग क्रमांक एक नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री.
हणमंतवाडी : प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण. सदर आरक्षण हे ज्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात काढण्यात आले. या आरक्षण सोडतीला ग्रामस्थ उपस्थित होते.


