Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागातील शिवसेनेला नवी ऊर्जा मिळण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशाने नव्या निवडी!

जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती


ठाकरे पक्ष शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भागातील शिवसेनेला एक नवी ऊर्जा मिळावी व पक्ष संघटना मजबूत व्हावी यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार काही बदल करत  नव्याने पदाधिकारी निवडी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती  जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.  



शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी काल कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. त्या निवडी पुढील प्रमाणे आहेत- पद, नाव, कंसात कार्यक्षेत्र :


 उपजिल्हाप्रमुख - संभाजी पाटील ( चंदगड विधानसभा), सुरेश चौगुले ( राधानगरी तालुका).


विधानसभा क्षेत्र प्रमुख - सूर्यकांत भोईटे ( राधानगरी विधानसभा), राजू रेडेकर  (चंदगड विधानसभा).


 तालुका संघटक -


प्रतीक क्षीरसागर (गडहिंग्लज तालुका), सागर भावके ( राधानगरी तालुका), मारुती पुरीबुवा ( कागल तालुका), विक्रम मुतकेकर ( चंदगड तालुका), राजेंद्र सावंत ( आजरा तालुका), बचाराम गुरव ( भुदरगड तालुका).


तालुकाप्रमुख - उत्तम पाटील ( कसबा तारळे/ राधानगरी जि.प ), बाळासाहेब पाटील ( सरवडे / वाळवा / राशिवडे जि.प ), कृष्णा  डाकरे ( पिंपळगाव/ कडगाव जि.प ), अविनाश शिंदे( गारगोटी / शेणगाव जि.प), जयसिंग टिकले ( चिखली / कापशी जि.प), शिवगोंडा पाटील ( बोरवडे / क. सांगाव/ सिद्धनेर्ली जि.प), युवराज पोवार (आजरा तालुका), दिलीप माने ( महागाव - भडगाव/ हलकर्णी- बसर्गे/ नेसरी बटकणंगले जि. प ), अजित खोत ( नूल- हसूरचंपू/ गिजवणे/ कौलगे-कडगाव/गडहिंग्लज शहर जि. प). 


कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण शिवसेना बळकट करण्यासाठी सदर बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही जुन्या पदाधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्षातील त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला नवी ऊर्जा मिळण्यास मदत होणार आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात आले आहेत. अजूनही पक्षातील काही जुन्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच उर्वरित नियुक्त्या देखील जाहीर करण्यात येणार आहेत. पक्षातील जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा योग्य तो मान-सन्मान ठेवून त्यांची देखील योग्य ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे. एकंदरीत पक्षाला ऊर्जा  व बळकटी मिळण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष हित लक्षात घेऊन शिवसेना नेते अनिल देसाई, दगडूदादा सकपाळ, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली  काही बदल वरिष्ठ पातळीवरून सुचविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकदिलाने व एकजुटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.