Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याकडून श्री काळभैरीला चांदीची प्रभावळ अर्पण

मूर्तीच्या पाठीमागील भिंतीवर बसविण्यात आली आकर्षक प्रभावळ


श्री. पाटील यांचा संकल्प पूर्णत्वास 



 बड्याचीवाडी : श्री काळभैरव देवाच्या मूर्तीच्या पाठीमागे बसविण्यात आलेली आकर्षक चांदीची प्रभावळ. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): भाजपचे नेते व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी श्री स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून  गडहिंग्लजसह सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डोंगरावरील श्री काळभैरव मंदिरासाठी चांदीची प्रभावळ अर्पण केली आहे. सदर प्रभावळ ही मूर्तीच्या पाठीमागील  बाजूच्या भिंतीवर बसविण्यात आली आहे.





गेल्या वर्षी शिवाजीराव पाटील यात्रेनिमित्त श्री काळभैरवाच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते. दर्शन घेताना मूर्तीच्या पाठीमागील भिंतीचा भाग त्यांना रिकामा दिसला. त्यामुळे पुढील वर्षी यात्रेपूर्वी मूर्ती मागील संपूर्ण भिंतीवर चांदीची प्रभावळ बसवून देण्याचा संकल्प त्यांनी केला होता. उद्या श्री काळभैरव देवाची वार्षिक यात्रा होत आहे. यात्रेपूर्वी आज शिवाजीराव पाटील यांनी सदर चांदीची प्रभावळ मंदिराकडे सुपूर्द केली. हे प्रभावळ बसविण्यात आल्याने श्री काळभैरव देवाची मूर्ती आणखी उठून दिसत आहे. सदर चांदीची प्रभावळ ही कोल्हापूरच्या अंबाबाई पालखीचे कारागीर सुवर्णकार गणेश चव्हाण यांनी घडवली आहे. संपूर्ण प्रभावळ ही शिवाजीराव पाटील यांनी स्वखर्चाने करून दिली आहे. याबद्दल संपूर्ण गडहिंग्लजकर व भक्तानी शिवाजीराव पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.