Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात जागतिक पाणी दिवस साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात ग्रीन क्लबच्या वतीने ‘जागतिक पाणी दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी पाण्याचे महत्व सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले.



या भित्तीपत्रकाचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. ए. जी. हारदारे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ‘जागतिक पाणी दिवस’ महत्व सांगितले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात पृथ्वीवर पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातील केवळ २५ टक्केच पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ग्रीन क्लबच्या विद्यार्थ्यांनी या पाण्याच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणे आवश्यक आहे असे आवाहन केले.




शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीनी तयार केलेल्या या भित्तीपत्रकामध्ये देशातील व राज्यातील पाण्याची पातळी, नैसर्गिक संसाधन, पाण्याचा अपव्यय होण्याची ठिकाणे आणि पाणी कशापद्धतीने वापरले पाहिजे याची माहिती समाविष्ठ करण्यात आली आहे. नैसर्गिक स्त्रोताच्या व्यवस्थापनाविषयी व जनजागृती करण्यासाठी या भित्तीपत्रकाव्दारे माहिती देण्यात आली आहे. यावेळी प्राध्यापक, ग्रीन क्लबचे सर्व सदस्य यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.