गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालयात एक दिवसीय इंटलेक्च्युल प्रोपर्टी राईट या विषयांवर कार्यशाळा पार पाडली. कार्यशाळेत बडोदा येथील नामांकित 'मायक्रेव कन्सल्टन्सीचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव ब्रम्हभट व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मेनन यानी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईटस् विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय सावंत हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांसाठी पेटंट, ट्रेडमार्क कॉपीराईट यावर चर्चासत्र झाले. यामध्ये सर्व विभागातील प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनादेखील पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट विषयी माहिती जाणून घेतली. व्यवसायिक दृष्टीकोनातून कायदेशीर बाबी कशा हाताळाव्यात तसेच आपल्या मालमत्तेचे सरंक्षण कायद्याच्या चौकटीत राहून कसे करावे, या संदर्भातील समज गैरसमज यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे प्राध्यापक व विद्यार्थी यांना जास्तीत जास्त पेटेंट फाईल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
समन्वयक म्हणून प्रा. एस. पी. देशमूख यांनी काम पाहिले. यावेळी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट समन्वयक डॉ. अमोल माने, डॉ. ए. जे. देवकर, प्रा. के. ए. चव्हाण, प्रा. ए. पी. नारायणकर, प्रा.ए.पी. मेहंदळे हे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. रूपाली बांदेकर यांनी केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. संजय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रा. एस. पी. देशमुख यांनी मानले.


