Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा वेध घेणे आवश्यक!

शिवाजी विद्यापीठ रजिष्ट्रार डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे प्रतिपादन


गडहिंग्लजला संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ


                                                 सर्व छायाचित्रे : मज्जिद किल्लेदार 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा वेध घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवाक्यातील ध्येय ठेवावे आणि या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी. जेणेकरून लवकरात-लवकर ध्येय साध्य करून आपल्या जीवनात यशस्वी होणे शक्य होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे रजिष्ट्रार डॉ.व्ही.एन.शिंदे यांनी केले.




गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलामध्ये संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. तर उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. जीवन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.




यावेळी शिवाजी विद्यापीठ रजिष्ट्रार डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी ‘यशस्वी होण्यासाठी...' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्यातील विद्यार्थीपण जिवंत आणि जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या अंगी शहाणपण येण्यासाठी आपले डोळे उघडे ठेवा आणि आपली पंच इंद्रिये जागृत ठेवली पाहिजे. शिक्षणाने आपण साक्षर होतो पण आपल्याकडे शहाणपण येईल यादृष्टीने प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यातील कमजोरी ही ताकद कशी बनेल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी व्हाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुष्यात जे-जे काही मिळेल ते वाचण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपल्याला सुज्ञपणाने जी समज येईल ती घेणे आवश्यक आहे. आपण वाचाल तरच वाचाल. वाचनातून चांगले विचार वेचा आणि साठवून नेमकेपणाने आठवा आणि आपल्यात क्षमता असलेल्या बुद्धीचा जास्तीत-जास्त वापर करून आपली विचार प्रक्रिया सुरु ठेवा आणि आपले यशस्वी असे व्यक्तिमत्व घडवा. जीवनात कोणत्याही शॉर्टकटचा वापर न करता आपण यशस्वी व्हावे असे आवाहनही यावेळी डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले.




प्रमुख पाहुणे उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ.जीवन पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी चांगले काही आत्मसात केले पाहिजे. मोबाईलचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी नेहमी अपडेट राहणे गरजेचे आहे. आपल्याला हवे असलेले क्षेत्र निवडा ते साध्य घेण्यासाठी खूप मेहनत घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी आपले आई-वडील व शिक्षकांचा आदर करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. आपण कसे घडलो आणि नीट परीक्षेबाबत त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून शिवराज विद्या संकुलात सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवराज विद्या संकुलात उपलब्ध असलेल्या शिक्षणातून समृद्ध होऊन जग जिंकण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.



विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी शिवराज विद्या संकुल नेहमीच विद्यार्थ्यांना दिशा देत आहे. शिवराज विद्या संकुल हे स्वायत्त विद्यापीठ व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून अधिका-अधिक सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.





स्वागत व प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांनी केले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनीही मार्गदर्शन केले.  श्रावणी शेट्टी, रिहान पठाण या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा.आझाद पटेल, विना अनुदानित ज्युनिअर सायन्स विंगचे प्रमुख प्रा. संदीप कुराडे, शिवराज इंग्लिश मेडियमचे मुख्याध्यापक ए.बी.पाटील, प्रा.आर. डी. कमते, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे, अकॅडमिक हेड प्रा. के. एस. देसाई, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह ज्युनिअर विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विद्या पाटील. प्रा. ए. ए. गोनी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.