Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टिसीजी युनायटेड बेबी लीग फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कुलला दुहेरी विजेतेपद

काळू मास्तर विद्यालय, सर्वोदया स्कुलला उपविजेतेपद





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : टिसीजी युनायटेड बेबी फुटबॉल लीग स्पर्धेत दहा आणि बारा वर्षे या दोन्ही गटात शिवराज स्कूलने  विजेतेपद पटकाविले. त्यांनी अनुक्रमे काळू मास्तर विद्यालय आणि सर्वोदया स्कुलचा पराभव केला. शिवराजचे प्रतीक कांबळे, रणवीर कुराडे हे स्पर्धा वीरचे मानकरी ठरले. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशन (टिसीजी) मार्फत गेले पंधरा दिवस ही स्पर्धा सुरु होती. दिनकरराव शिंदे विदयालयाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत २३ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष होते.




दहा वर्षाखालील अंतिम सामन्यात शिवराज स्कुल पूर्वार्धात प्रतिक कांबळेच्या निर्णायक गोलच्या जोरावर काळू मास्तर विद्यालयाला नमविले. उत्तरार्धात काळू मास्तरच्या अय्यान पटेल, शब्बीर हेब्बाळे, सुरज शिंगे यांनी पाठोपाठ चढाया करून जेरीस आणले. पण, शिवराजने चिवट बचाव करून विजेतेपद साकारले. बारा वर्षाखालील अंतिम सामना अटीतटीचा झाला. सर्वोदया स्कुलने शिवराजला निर्धारित वेळेत १-१ असे बरोबरीत रोखले. रणवीर कुराडे, श्रेयस पाटीलने गोल केले. टायब्रेकरमध्येही कोंडी ४-४ अशी कायम राहिली. सडनडेथमध्ये शिवराजने बाजी मारली. शिवराजतर्फे समीर मणेर, रणवीर कुराडे, फरहान नदाफ, धैर्यशील वाघ तर सर्वोदयाच्या श्रेयस पाटील, विराज शिंदे, स्वरुप पाटील यांनी गोल केले.




दरम्यान, बारा वर्षे गटाच्या उपांत्य लढतीत शिवराजने शिवाजी विद्यालयाचा ४-३ तर सर्वोदयाने काळू मास्तर विदयालयाचा टायब्रेकरमध्ये ६-५ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. टिसीजी फौंडेशनचे प्रा. प्रमोद इंचनाळकर, गंगाराम नाईक, राजू भोपळे, संजय पाटील, डॉ अनिल कुराडे, मल्लिकार्जून बेल्लद यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आली. समन्वयक हर्षल कुरळे यांनी स्वागत केले. स्पर्धा संयोजक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. यावेळी सुरेश कोळकी, महादेव पाटील, विष्णू कुराडे, शक्ती चौगुले, प्रसाद गवळी, तानाजी देवेकर, उपस्थित होते. समन्वयक यश पाटील यांनी आभार मानले. समर्थ यादव यांनी सुत्रसंचालन केले.





स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू



स्पर्धावीर : प्रतिक कांबळे(शिवराज) रणवीर कुराडे (शिवराज)


गोलरक्षक : समर्थ शेटके (शिवराज) फारूक मकानदार (शिवराज)        


बचावपटू : शब्बीर हेब्बाळे (काळू मास्तर),स्वरुप पाटील (सर्वोदया)


मध्यरक्षक :  अय्यान पटेल (काळू मास्तर), अभिषेक सासने (शिवाजी)


आघाडीपटू : आसद पठाण (शिवराज) : अनुप विटेकरी (काळू मास्तर)


व्हिडिओ येथे पहा 👇







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.