Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अप्पी पाटील यांचा छत्रपती शाहू महाराजांना पाठींबा

महागावात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत जाहीर केला निर्णय 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराज यांच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळाला आहे. समतेचा वारसा पुढे घेऊन जायाचा असेल तर छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेवर पाठवणे गरजेचे आहे, यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना साथ देणार असल्याची घोषणा अप्पी पाटील यांनी केली. 



महागाव (ता गडहिंग्लज) येथे लोकसभा निवडणुकीमध्ये अप्पी गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अप्पी पाटील युवा मंच कडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षपदी सरपंच प्रशांत शिंदे होते.




                    

यावेळी बोलताना अप्पी पाटील पुढे म्हणाले, सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंत ज्यांना ज्यांना मदत केली त्यांनी ऐनवेळी आम्हाला बाजूला ठेवले. राजर्षी शाहू महाराज यांचा समतेचा विचार संसदेत पोचविण्यासाठी शाहू छत्रपतींना पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.



यावेळी उपसरपंच संदीप कोकितकर, अमर कांबळे, राजू खमलेट्टी, महंमद पठाण, जयदीप सरनोबत, उदय सोमशेट्टी, महादेव नाईक, नागेश पाटील, रोहित यलगूडे, सुभाष पाटील, शंकर कुराडे, सुभाष घेवडे, पांडुरंग चौगुले यांनी आपल्या भावना मेळाव्यात व्यक्त केल्या.




या मेळाव्याला प्रकाश पट्टणशेट्टी, सुभाष पाटील, बाजीराव पाटील, विश्वास कलाल, दिलीप पाटील,भीमराव पट्टणकुडी, सचिन गुरव, शिवाजी बिरंजे, कॅप्टन महादेव घुगरे, प्रवीण चिमणे, शंकर घुगरे, शिवाजी इंगवले, सतीश फडके, संभाजी रेडेकर, नंदकुमार चोथे, चंद्रकांत खणदाळे यांच्यासह चंदगड विधानसभा मतदारसंघातील अप्पी पाटील युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.