Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम स्वेच्छेने करणाऱ्या ताहीर मकानदार यांच्या कार्याचा यथोचित गौरव



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजच्या सखी महिला मंडळ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने  गडहिंग्लज मध्ये चालू असलेल्या हायवेच्या कामामुळे होणारे वाहतुकीचे विस्कळीत वातावरण पाहून शहरातल्या जामा मशीद येथे प्रत्यक्ष रोडवर गेली दोन महिने समाज सेवेच्या भावनेतून ट्रॅफिक नियंत्रणाचे काम सामाजिक भावनेतून स्वेच्छेने  करणारे ताहीर मकानदार यांचा सत्कार करून सामाजिकता जपली.



ताहीर मकानदार यांनी शहरामध्ये ट्रॅफिक नियंत्रणाचे काम करून येणाऱ्या -जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ऐन कडक उन्हामध्ये रमजान महिन्यात  केलेली सेवा समाजाच्या कल्याणाचे व्रत जपले आहे. त्यांच्या या त्यागी  कार्याचे कौतुक करून त्यांनी शहरातील सर्वांसाठी जपलेले हे आपलेपण खरोखरच प्रेरणादायी आहे. ताहीर मकानदार यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रमजान महिन्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीमध्ये हा सत्कार करून एकप्रकारची सामाजिक सलोखा जपण्यात आला.


यावेळी सखी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ.उज्वला दळवी, श्रीमती अरुणा शिंदे, श्रीमती उर्मिला कदम, सौ. सुमन सावंत, सौ.सुवर्णलता गोविलकर, सौ. छाया वडगावे, सौ.गीता पाटील, सौ. शारदा अजळकर, सविता चव्हाण, सौ. गीता पालकर तसेच श्री बाळासाहेब मुल्ला हे सर्व कार्यकर्ते  तसेच अनेक  नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सत्कार संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.