Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू करण्याची मागणी

ठाकरे पक्ष शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन 


उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली वेधले लक्ष 


गडहिंग्लज : कार्यालयीन अधीक्षक एम.जी. डवरी यांना निवेदन देताना ठाकरे पक्ष शिवसेनेचे उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी.



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने वैद्यकीय अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. सदर निवेदन कार्यालयीन अधीक्षक एम.जी. डवरी यांनी स्वीकारले.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय हे गडहिंग्लज तालुक्यासह सीमा भागातील गोरगरीब लोकांसाठी आधार आहे. दररोज या रुग्णालयात किमान पाचशे बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. तर महिन्याकाठी दोनशेच्यावर प्रसूती केल्या जातात. त्याबरोबरच हर्निया, अपेंडिक्स, अल्सर आदींसह विविध मोठ्या शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. या सर्व शास्त्रक्रिया करण्यापूर्वी सोनोग्राफीची आवश्यकता असते. ही गरज ओळखून या रुग्णालयात सोनोग्राफी मशीनची सोय करण्यात आली आहे. दर मंगळवारी व बुधवारी सदर तपासणी केली जाते. मात्र गेल्या दोन तीन महिन्यापासून सोनोग्राफी तपासणी बंद करण्यात आली आहे. सदर मशीन हाताळण्यासाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यास शहरातील खासगी सोनोग्राफी केंद्रातील डॉक्टरांच्या मदतीने आठवड्यातून एक दिवस रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी करण्यात यावी. तसेच केस पेपर करण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२.३० असताना बारा वाजताच  बंद केले जाते. यामध्ये देखील सुधारणा करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


या निवेदनावर उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, प्रकाश पाटील, लक्ष्मण पाच्छापुरे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.