Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

पुण्यतिथी उत्सव निमित्त 28 एप्रिल ते 4 मे अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर येथे श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्यावतीने  विविध कार्यक्रम संपन्न झाले.


दिनांक 3 ते 10 एप्रिल पर्यंत सकाळी गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले. 10 एप्रिल रोजी सकाळी श्री स्वामी समर्थ पादुका लघु रुद्राभिषेक व तीर्थ प्रसादाचे वाटप झाले. रात्री आठ वाजता महाआरती सौ व श्री अरुण गवळी यांच्या हस्ते झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री साडेआठ वाजता  श्री स्वामी समर्थभजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.




यावेळी सुहास कोकिळे, अरुण गवळी, हेमा यशवंत, विकास मोटे, ग्रामसेवक महेश सुतार, विलास सोलापुरे, आनंद चनापगोळ, तलाठी दूंडाप्पा पाटील, दिनकर खवरे, मनोज कलकुटगी, उदय इंदुलकर, लक्ष्मण पोतदार, ह भ प काशिनाथ सुळकुडे, सुभाष कल्याणी, सहदेवसिंग शिलेदार यांच्यासह ग्रामस्थ, स्वामीभक्त, सर्व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रविवार दिनांक  28 एप्रिल ते शनिवार दिनांक 4 मे अखेर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव निमित्त पालखी परिक्रमा वर्ष पंधरावे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ स्वामी भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.