Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या श्री करनाईक देवाची १५ मे रोजी यात्रा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणीसह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करनाईक देवाची यात्रा १५ मे रोजी करण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. 




श्री करनाईक देव हे तेरणी गावासह परिसरातील गावांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा हा देव असल्याने या यात्रेसाठी हजारो भाविक येतात. दरवर्षी बसवेश्वर जयंती नंतर ही यात्रा पार पडते. नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे वास्तव्यास असणारे मुंबईकर ग्रामस्थ या यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी खास सुट्टी घेऊन गावाकडे येतात. त्यामुळे या यात्रेची शोभा वाढते. या बैठकीत यात्रे संदर्भातील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.