कोल्हापूर : येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या विद्यमाने निर्भया पथकाचे "महिला सक्षमीकरण जनजागृती" शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पूजनाने करण्यात आली. सुरूवातीला कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी निर्भया पथक, त्यांचे कार्य याविषयी माहिती दिली व पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुण्या निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कांती पाटील यांनी निर्भया पथक कशा प्रकारे काम करते हे सांगितले. तसेच लैगिंक छळ प्रतिबंध कायदा, पोक्सो कायदा व रॅगिंग कायदा याबद्दल माहिती दिली. मुली आणि महिलांमधील भिती घालवण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले. अन्याय सहन न करता निर्भय बनत तकार करा असे आवाहन त्यांनी केले. पोक्सो अंतर्गत १८ वर्षाखालील मुलगा असो की मुलगी त्याच्यांवर अत्याचार करणारा कधीच सुटत नाही. इतका हा कायदा कडक आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमास रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिंडेट श्रेयस पाटील, सनम पटेल, प्रणोती जोशी, तसेच शाहुपरी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकातील सर्व सहकारी व पोलिस मित्र उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी निवेकर यांनी केले. आभार प्रा. दिव्या शिर्के यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियूषा नेजदार यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला कॉलेजच्या विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



