Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील भीमनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

                                                छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील भीमनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.




प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर अभिवादन सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बहुजन समता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाबुराव आयवाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ठाकरे पक्ष शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष चिकोडे उपस्थित होते. यावेळी श्री. चिकोडे, श्री. आयवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश सलवादे, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.




या कार्यक्रमास जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पुंडलिक सावरे, सदस्य संतोष कांबळे, अमित गुंठे, सुनील सुळकुडे, संगीता विटेकरी, शालन कासारीकर  गुंडू पाटील, संदीप कुराडे, दिगंबर विटेकरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पप्पू सलवादे यांनी तर सूत्रसंचालन व आभार दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मानले.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.