सनी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व सनी वाचनालयमार्फत आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथील सनी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व सनी वाचनालयमार्फत हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सकाळी सहा वाजता हरिभक्त भजनी मंडळ यांच्याकडून जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी सात वाजता प्रवचनकार संगीत साहित्य विशारद परमपूज्य श्री निजगुण देवरु श्री सिद्धलिंग कैवल्य आश्रम हुनशाळ, तालुका गोकाक यांचे आशीर्वादपर प्रवचन संपन्न झाले. महाराजांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी गावातील ओमकार भिमापा संकेश्वरी याची कृषी सेवक महाराष्ट्र राज्य व अक्षता सिद्धगोंडा पाटील हिची शेती विभागीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच आपला जीव धोक्यात घालून अनेक कुटुंबांना जीवदान देणाऱ्या शिवाजी भीमा सावंत यांचा विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याने आझाद नगर, गोल्डन नेस्ट भाईंदर येथे लागलेल्या भीषण आगीत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक जीवांना जीवदान दिले होते.
आपल्या प्रवचनात महाराजांनी हनुमान देवाच्या कार्याची व भक्तीची माहिती सांगितली. यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यानंतर गावातील वीरशैव तरुण मंडळ, राजे ग्रुप, हरिभक्त भजनी मंडळ, बसवसेना, बजरंग ग्रुप, नदीवेस तरुण मंडळ, संत निरंकारी मंडळ, जय गणेश तरुण मंडळ, एकता ग्रुप, अनिरुद्ध बापू उपासना केंद्र, विश्वकर्मा मंडळ, अष्टविनायक मंडळ, जाणता राजा मंडळ, संत गोरोबाकाका मंडळ, शिवप्रेमी तरुण मंडळ, एकाकी झुंज तरुण मंडळ, आकर्षक तरुण मंडळ, यांच्यामार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या उत्सवासाठी विद्युत रोषणाई देव लाॅन्स यांच्याकडून व हॅलोजन व्यवस्था रवींद्र मगदूम व अजित मगदूम व ज्योती गारमेंट्स यांच्याकडून करण्यात आली होती .जनरेटरची व्यवस्था अक्षय दादा युवा मंच यांच्याकडून करण्यात आली होती. उपस्थित सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे सर यांनी केले. आभार राजू नाईक यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले


