गावातील 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बेसिक इंग्लिश कोर्सचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उपक्रम
आजरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किणे गावातील 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बेसिक इंग्लिश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. येथील संकल्प ग्रामविकास प्रतिष्ठानने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
निवृत्त शिक्षक तुकाराम पताडे गुरूजी आणि मारूती गिलबिले यांच्या हस्ते सदर कोर्सचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. हा बेसिक कोर्स विद्यार्थ्यांना कसा उपयोगी आहे आणि त्याचे महत्त्व सांगितले सर्वांनी आपल्या मनोगतातून सांगितले. हा 40 दिवसाचा कोर्स पूर्णपणे मोफत आहे. ह्या कोर्ससाठी आर्थिक मदत प्रतिष्ठानचे सचीव उदय मारूती गिलबिले यांच्याकडून मिळाले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महादेव सुतार, सहसचिव पांडुरंग शिंदे, मारूती गिलबिले, संतराम केसरकर, आकाश सुतार, पंकज केसरकर, दमयंती तुपट, श्रीकात बामणे, दिपेश नाईक यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. महादेव सुतार यांनी आभार मानले.
बातमीचा व्हिडिओ येथे पहा 👇



