Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हिडदुगी हायस्कूलमध्ये सोहळा कृतज्ञतेचा सन्मान गुरुजनांचा!



गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिडदुगी हायस्कूल, हिडदुगी (ता. गडहिंग्लज) च्या सन १९९०-९१ पासून ते सन २०२३-२४ अखेर मुलामुलींचा ३३ वर्षानंतर मोठ्या उत्साही वातावरणात स्नेहमेळावा पार पडला. नोकरी व्यवसाय, संसार हे सारे बाजूला ठेवून जवळजवळ ६०० माजी विद्यार्थी या मेळाव्यात सह‌भागी झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी ज्या शिक्षकांनी ज्ञानदान केले, त्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे होते.




यावेळी राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे यांचा सत्कार करण्यात आला.




सुगंधा रेडेकर हिच्या इशस्तवनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले. स्वागत अनिल पाटील यानी केले. प्रास्ताविकेतून सुगंधा रेडेकर यांनी कार्यक्रमाचा हेतु कथन केला. मानपत्राचे वाचन अश्विनी रेडेकर, ऋतुजा कानडे, उज्व‌ला रेडेकर यांनी केले.




आप्पा निलवे, अनिल निलने, रुपाली रेडेकर, संतोष गुरव, अमर गुरव, अविनाश गुरव, श्रीराम रडेकर, प्रथमेश आळवणे यांनी स्नेहमेळाव्या‌चे नियोजन केले. सुवर्णा जाशिलकर, सुवर्णा बेळीकट्टे, आनंदा घोलराखे, वैशाली वारके, रोहीत जोशी, वैशाली रेडेकर, भागीरथी आळवणे यांनी मनोगत व्यक्त केले.



सतीश रेडेकर, गणपतराव पट्टणकुडी यांची भाषण झाले. मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे यांनी सत्कार बद्दल  कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिसीरोटी यांनी केले. आभार अमर राजगोळे यांनी मानले.


 कार्यक्रमाचा व्हिडिओ येथे पहा 👇






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.