Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड विधानसभा मतदारसंघात ६२.४८ टक्के मतदान

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.७१ टक्के मतदान


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान


                                छायाचित्र  : अशपाक किल्लेदार, गडहिंग्लज 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२.४८ टक्के मतदान झाले. ३ लाख १७ हजार ९२२ मतदारांपैकी १ लाख ९८ हजार ६४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६३.७१ टक्के मतदान झाले.




कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांतील चंदगड विधानसभा मतदारसंघात ६२.४८, कागल ६८.२७, करवीर ६९.८७, कोल्हापूर उत्तर ५९.४१, कोल्हापूर दक्षिण ६०.५९, राधानगरी ६१.६६ टक्के इतके मतदान झाले.



यंदा प्रत्येक गावागावात मोठ्या चुरशीने मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. वाढत्या उन्हामुळे सकाळी व सायंकाळच्या सत्रात मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले. वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर मतदान केंद्रांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी केंद्रांवर पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



निवडणूक आयोगाने शासकीय पातळीवरून विविध उपक्रमाद्वारे मतदार जनजागृती सुरू ठेवल्याने यंदा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. उमेदवारांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी देखील जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. बऱ्याच ठिकाणी हरित मतदान केंद्र तसेच मतदारांसाठी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आले होते. बऱ्याच ठिकाणी मतदार कुटुंबासह मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले. मतदानानंतर मतदारांनी सेल्फी काढुन आपल्या व्हाट्सअपच्या स्टेटसला ठेवत 'मी मतदान केलो.. तुम्हीही करा' असा संदेशदिल्याचे दिसले. त्यामुळे मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्स्फूर्तपणा व उत्साह दिसून आला.




अकरा मतदारसंघात सरासरी  ५३.४० टक्के मतदान


राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सरासरी  ५३.४० टक्के मतदान झाले आहे. 



एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :


लातूर - ५५.३८ टक्के 

सांगली - ५२.५६  टक्के

बारामती - ४५.६८ टक्के

हातकणंगले - ६२.१८ टक्के

कोल्हापूर -  ६३.७१ टक्के

माढा - ५०.००  टक्के

उस्मानाबाद -  ५२.७८ टक्के

रायगड - ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५३.७५ टक्के

सातारा -  ५४.११ टक्के

सोलापूर - ४९.१७   टक्के




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.