Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कवळीकट्टी येथे दीडशे ग्रामस्थ राहिले मतदानापासून वंचित!

मतदार यादीतून नावेच गायब झाल्याने ग्रामस्थ संतप्त 


डॉ. रियाजभाई शमनजी यांच्या उपस्थितीत तलाठी यांच्याकडे निवेदन  सादर करत वेधले लक्ष  





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी या गावातील जवळपास शंभर ते दीडशे ग्रामस्थांची मतदान यादीतून नावे गायब झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. याबाबत ठाकरे पक्ष शिवसेनेचे नेते डॉ. रियाजभाई शमनजी यांनी गाव कामगार तलाठी यांच्याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे.



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. या निमित्ताने डॉ. रियाजभाई शमनजी यांनी कवळीकट्टी गावाला भेट दिली होती. यावेळी मतदार यादीतून जवळपास दीडशे ग्रामस्थांची नावे गायब झाल्याचे आढळून आले. या संदर्भात तलाठी यांना जाब विचारला असता त्यांनी 'कसं झालं ते आम्हाला माहिती नाही व आम्ही काय करू शकत नाही' असे उत्तर दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.  आमची नावे मतदार यादीतून का वगळली आहेत किंवा का कमी केली आहेत याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.  सदर निवेदन  शिवसेनेचे शाखाप्रमुख  मारुती सावंत व ग्रामस्थांनी डॉ. रियाजभाई  शमनजी यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात दिलेले आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते   भारत जाधव, आनंदा माने, युनुस नंदीकर यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.