गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील हलकर्णी या गावच्या सुभद्रा चंद्रू नेसरकर या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांमुळे जटामुक्त झाल्या.
75 वर्षाच्या सुभद्रा नेसरीकर यांनी डोक्यावर ठेवलेल्या जटेने त्रस्त झाल्या होत्या. डोक्यात जटेचा पिंजोळा तयार झाला होता. त्या आपला मुलगा सुरेश व सून सरिता यांच्याबरोबर पुणे येथे राहत होत्या. सुनेने वारंवार समजावल्याने त्या जट काढण्यास तयार झाल्या. मुलगा सुरेश यांनी गडहिंग्लज अंनिस शाखेची संपर्क साधून आईला प्रबोधन करून जट मुक्त करावी अशी विनंती केली.
त्यानुसार कोल्हापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला, प्राचार्य साताप्पा कांबळे, कॉम्रेड उज्वला दळवी, उर्मिला कदम, सुमन सावंत यांनी सुभद्रा मावशीला जटमुक्त करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत साडीचोळी पुष्पगुच्छ देऊन सुभद्रा मावशी, मुलगा व सून यांचा सत्कार करण्यात आला.




