Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नांगनूरात श्री राम हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची ३० वर्षांनी भरली शाळा

१९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात 


एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करत जुन्या आठवणींना दिला उजाळा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूर येथील श्री राम हायस्कूलच्या १९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ३० वर्षांनी मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमानी पार पडला. एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करण्यासह शालेय जीवनात केलेल्या खोड्या, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला.




प्रा. डॉ. सचिन शिंदे, दिपक मोकाशी, विनोद भंगे,  काशिनाथ पोरीवाडे, नारायण नार्वेकर, अनिता मोकाशी यांच्या पुढाकाराने स्नेह मेळाव्याचे  नियोजन केले होते.  प्राथमिक शाळेत प्रवेशद्वारापासून  संदेशात्मक  लक्षवेधी रांगोळ्या रेखाटल्या होत्या.  शिक्षक, विद्यार्थ्यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी आकर्षक फेटे परिधान केले होते. डॉ सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिक्षकांचे फोटो असलेले आणि  कृतज्ञतेने शब्दबद्ध केलेले वुडन स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला.




माजी मुख्याध्यापक के. बी. सुगते, एस. बी. पाटील, ए. बी. कल्याणी, एल. एस. कोडोली, हुमायून मुरसल,  कालेकाजी, कुडाळकर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ सचिन शिंदे, अनिता मोकाशी, अलका शिंदे  यांनी मनोगतातून शाळा व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.



स्नेह मेळाव्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शिक्षंकासह  माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काशिनाथ पोरीवाडे यांनी सुत्रसंचालन केले.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.