Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या अशोक देसाई ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश

बारावी परीक्षेत शंभर टक्के निकाल 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील अशोक रावसाहेब देसाई जुनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत कला व वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे या महाविद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.



या महाविद्यालयात शिल्पा राजकुमार देसाई (७५. ५० टक्के) प्रथम, गीता इराप्पा परीट (७१.८३टक्के ) द्वितीय तर चैत्रा गंगाप्पा भोई (६९टक्के) या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य डी. वाय. माने यांची प्रेरणा तर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.