Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई येथील पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक


कोल्हापूर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेलेल्या कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई येथील एका पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने होमगार्ड संतप्त बनत रस्त्यावर उतरल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या ह्या वागणुकीबद्दल होमगार्डमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या.



लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई येथे बंदोबस्तासाठी राज्यातून पोलीस  व होमगार्ड यांना मागविण्यात आले होते. यामध्ये होमगार्डची संख्या देखील मोठी होती. या बंदोबस्तासाठी  कोल्हापुरातून अनेक होमगार्ड मुंबईत गेले होते. त्याला दिलेले कर्तव्य व्यवस्थित त्यांनी पार पाडले. ड्युटी संपल्यानंतर सकाळी त्यांना मुंबईहून कोल्हापूरला सोडण्यासाठी रेल्वे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ती वेळेत सुटली नाही. सकाळ, दुपार करत संध्याकाळ झाली, तरी रेल्वे जाण्याची चिन्हे दिसत नसल्याने होमगार्डस वैतागले. त्यानंतर खेरवाडी येथे हे होमगार्ड एकत्रित झाले. त्यांनी या संदर्भात  पोलीस अधिकारी यांच्याकडे चौकशी केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे न देता दरडावून अवमानकारक वागणूक दिल्याने दिवसभर ताटकळत बसलेले होमगार्ड संतप्त झाले. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून देखील पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल होमगार्डसनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.