नामवंत कंपनीकडून ४९३ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे
महागावच्या 'संत गजानन 'अभियांत्रिकी प्लेसमेंटमुळे विद्यार्थी बनले आत्मनिर्भर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी विभागाकडील पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील इंजिनिअरिंग (पदवी) च्या १४२ पॉलिटेक्निक (पदविका)च्या १७६ तर पूल कॅम्पस मुलाखतीतून १७५ विद्यार्थ्यांना देशभरातील नामवंत कंपनीकडून नियुक्तीपत्रे देऊन आत्मनिर्भर बनवले. यात इंजीनियरिंग महाविद्यालयातील निरंजन पाटील,विनायक पाटील यांना (४.५लाख) पॉलिटेक्निक मधील साईराज पाटील, गोपाळ मुतगेकर यांना (३ लाख ) वार्षिक पॅकेज सह कंपनीत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती मिळाली असल्याची माहिती संस्थाध्यक्ष ॲड. डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.
शिक्षण समूहातील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत दरवर्षी देश विदेशातील नामवंत कंपनीकडून मुलाखतीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ३२ नामवंत कंपनीच्या मुलाखती पार पडल्या. यातून ४९३ विद्यार्थ्यांची निवड कंपनीच्या महत्त्वाच्या पदावर सर्वाधिक वेतनावर झाल्या. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी पॉलिटेक्निकचा प्लेसमेंट १०० टक्के झाला. तर इंजिनिअरिंग मधून ८५ टक्के विद्यार्थ्यांच्या नियुक्ती झाल्या असून उर्वरित विद्यार्थ्यांच्या नियुक्ती या जुलैपर्यंत पूर्ण होणार आहेत. या शिक्षण समूहाने आतापर्यंत हजारो युवकांना रोजगार व व्यवसाय निर्मितीला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवला आहे. यामुळेच या संस्थेत जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यांना नोकरी हमखास मिळतेच, हा विश्वास पक्का झाला असल्याचे मत संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी व्यक्त केले.
या कामी विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, रजिस्टार शिरीष गणाचार्य ,प्राचार्य डॉ. एस. एच.सावंत, प्रा. रोहिणी पाटील, प्लेसमेंट अधिकारी प्रा. संतोष गुरव ,प्रा. सिदगोंडा जबडे तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
या कंपन्या झाल्या सहभागी
विद्यार्थ्यांचे मुलाखती घेण्यासाठी इन्फ्रा मार्केट, टाटा मोटर्स, सुलझर, कल्याणी फोर्ज, एल्कम, बेलरीसे, एक्सेलर, एक्सेले, क्लासिक व्हील्स, सिग्मा,जी. ई. एरोस्पेस, जॉन डियर, फिलिप्स इंडिया, कमिंस इंडिया, ओवेन्स कॉर्निंग, लार्सन अँड टुब्रो, टाको पंच, केएसपीजी, एएसबी इंटरनॅशनल, बजाज ऑटो, म्या म्यागना ऑटोमॅटिव,दाना आनंद, नेक्स्टर ऑटोमेटिव्ह या प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या.


