गडहिंग्लज (प्रतिनिधी): नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली. या शाळेचा निकाल ९७.२२ टक्के लागला.
शाळेतून प्रणव बसवराज बुध ९० टक्के (प्रथम), श्वेता सुरेंद्र बुरुड ८७.८० टक्के (द्वितीय), सुस्मिता शिवराम भोई ८५.८० टक्के (तृतीय) असे यश मिळविले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. वाय. माने यांच्यासह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

