
महागाव : येथील संत गजानन महाराज फार्मसी पदविकेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण व इतर शिक्षक.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी पदवीकेच्या 21 विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपनीत निवड झाली.
यामध्ये वेदा क्लिनिकल साठी (3) अँटीला (11)तर भरारी डिजिटल सोल्युशन साठी (7) विद्यार्थ्यांची निवड झाली. सर्व विद्यार्थ्यांची मेडिकल फार्मासिस्ट या पदावर नियुक्ती झाली. त्यांना कंपनीकडून 1.8 ते 3.2 लाख वार्षिक वेतन व कंपनीच्या इतर सुविधांचा लाभ मिळणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण,डॉ. संजय चव्हाण,डॉ. यशवंत चव्हाण यांनी अभिनंदन केले तर प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.
