Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव येथील संत गजानन नर्सिंग मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

पंचवीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव


देश-विदेशातील नामांकित हॉस्पिटलमध्ये हजारो नोकऱ्या





गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज नर्सिंग अभ्यासक्रमाच्या एएनएम, जीएनएम, बीएस्सी नर्सिंग पदवी  व पॅरामेडिकलच्या अभ्यासक्रमासाठी  प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून याद्वारे नाव नोंदणी व प्रवेश निश्चिती करण्यात येत आहे.


गेली पंचवीस वर्ष अनुभव असणाऱ्या या नर्सिंग विभागातून प्रशिक्षित होऊन हजारो विद्यार्थ्यांनी देश विदेशातील नामांकित खाजगी व शासकीय हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. येथे प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार शैक्षणिक शुल्कात सवलती बरोबरच शिकवण्यासाठी प्रदीर्घ अनुभवी  व तज्ज्ञ व कुशल शिक्षक तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. प्रात्यक्षिक अनुभवासाठी सर्व सोयीनियुक्त दोनशे बेड चे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून कोर्स पूर्ण झाल्यानंतर शंभर टक्के शासकीय, निमशासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये स्टाफ, वार्ड, स्पेशलिटी नर्स, हॉस्पिटल नर्सिंगच्या अनेक नोकरीच्या संधी तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिकेसाठी एएनएम कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देत असल्यामुळे अशा वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची उत्तम संधी असणाऱ्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महागाव येथील प्रधान कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.