गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) वतीने जिलेबी वाटप करण्यात आले.
यावेळी गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजु रेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, उपतालुकाप्रमुख सुधाकर जगताप, सुरेश हेब्बाळे, विभागप्रमुख दिगंबर पाटील, विजय गोडसे, अण्णासाहेब चौगुले, उपशहरप्रमुख संदिप चव्हाण, संदिप कुराडे, काशिनाथ गडकरी, कमलेश गोरूले, सुभाष चव्हाण, चंदू नावलगी, संभाजी यरूडकर यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

