चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन
नौकुड येथे हुतात्मा मुंजाजी कदम यांच्या स्मारक बांधकामाला प्रारंभ
आमदार राजेश पाटील यांच्याकडून ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ब्रिटिशांविरुद्ध लढताना हुतात्मा झालेले किल्ले सामानगडचे शेवटचे किल्लेदार मुंजाजी कदम यांच्या नौकुड येथील स्मारकामुळे तरुणाईला नवी प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन चंदगडचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.
गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड येथे हुतात्मा मुंजाजी कदम यांच्या स्मारक बांधकाम कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नौकुड गावच्या हद्दीत किल्लेदार मुंजाजी कदम यांची समाधी आहे. या ठिकाणी स्मारक बांधकामासाठी बालमुकुंद कदम यांनी 13 गुंठे जागा विनामूल्य दिलेली आहे. या स्मारकस्थळासाठी ६५ लाखांचा निधी आमदार पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.
यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील पुढे म्हणाले, मी टीका टिपणीवर भर न देता कमी बोलतो व विकास कामे करून दाखविण्यावर जास्त भर देतो. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणी यासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी आज देखील ठामपणे उभी आहे. १९४४ साली ब्रिटिशांविरुद्ध लढताना किल्ले सामानगडचे शेवटचे किल्लेदार मुंजाजी कदम हे हुतात्मा झाले. नौकुड येथील त्यांच्या स्मारकामुळे तरुणाईला नवी प्रेरणा मिळण्यास मदत होईल. स्व. नरसिंगराव पाटील, बाबासाहेब कुपेकर यांनी ऐतिहासिक किल्ल्यांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळे किल्ले सामानगडाच्या विकासासाठी माझे सदैव सहकार्य राहील असे आश्वासन देखील आमदार पाटील यांनी यावेळी दिले.
प्रास्ताविकात सरपंच शुक्राचार्य चोथे म्हणाले, आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून हुतात्मा मुंजाजी कदम यांच्या स्मारक बांधकामासाठी ६५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर आमदार राजेश पाटील यांच्यामुळे गावात विविध विकास कामे झाली आहेत. त्यामध्ये रस्ते, गटार, पाणी, वीज, आरोग्य, शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसर सुशोभीकरण यासह विविध कामांचा समावेश आहे. आमदार राजेश पाटील यांच्यामुळे नौकुड गाव जिल्ह्यात आदर्श बनवण्यासाठी यश मिळाले आहे. गावच्या विकास कामांसाठी आम्ही केलेल्या पाठपुराव्याला आमदार राजेश पाटील यांच्याकडून नेहमीच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सरपंच श्री. चोथे यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण, के. टी. शेलार, रुद्राप्पा कोरे यांची भाषणे झाली. स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिलेले बालमुकुंद कदम यांचा आमदार पाटील यांच्यासह सरपंच शुक्राचार्यच चोथे, ग्रामसेवक विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष अभयराव देसाई (सरकार), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जिल्हा मजूर संघाचे तज्ञ संचालक दिपक पुजारी, हलकर्णीचे युवा उद्योजक शिवकुमार संसुद्दी, विकी कोणकेरी, लक्ष्मण तोडकर, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर प्रसाद जोशी, बसवराज पुजारी यांच्यासह निवृत्त तहसीलदार आर.डी.कोरे, ज्ञानगंगा वाचनालयाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, माजी उपसरपंच भिमराव गोडसे, सुधाकर चव्हाण, सेवा संस्थेचे चेअरमन बाबुराव कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोहार, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुनिल शेलार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, विवेकानंद नार्वेकर, सचिन गोडसे, डॉ.बाबुराव गोईलकर, बाबूराव बिरंजे, संभाजी चौगुले, चाळू गुरव, श्रीकांत गुरव, बालमुकुंद कदम, शामराव कदम, जोतिबा मांगले, महादेव गोईलकर, पांडुरंग कदम, जयवंत बिरंजे, राजाराम लोहार, धोंडीबा गोईलकर, उपसरपंच रेखा सरदेसाई, सदस्या हिराबाई चौगुले, सुवर्णा गोसावी, सुरेखा गुरव, शितल मांगले, ग्रामसंघ अध्यक्षा कल्पना कदम, नंदिनी कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत सर्जेराव कदम यांनी केले.




