Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देऊ, तुम्ही तयारीला लागा!

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना शब्द 


चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची सांगली येथे घेतली भेट 


अमरसिंह चव्हाण यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांनी केली मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत आजपर्यंत मोठ्या निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्याला आगामी विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात न्याय दिला जाईल, असा शब्द देत कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.



चंदगड विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमरसिंह चव्हाण व शिवप्रसाद तेली यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सांगली येथे भेट घेतली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक मोठ्या जोमाने लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी यावेळी दाखवली. गेल्या वर्षभरात चंदगड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती कार्यकर्त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काम करताना खासदार श्री शाहू छत्रपती यांच्या विजयासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलेल्या योगदानाचीही माहिती देण्यात आली. चंदगड विधानसभा मतदारसंघात  पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देऊन पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. पक्षाशी निष्ठावान असणारे  माजी जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली व माजी सभापती अमरसिंह चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत विचार व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल असा शब्द देत सकारात्मकता दर्शवली. त्याचबरोबर मोठ्या जोमाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.



यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आर. के. पोवार, माजी आमदार राजू आवळे, कोल्हापूर युवक राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रोहीतदादा पाटील यांचीही भेट घेत आगामी विधानसभा निवडणूक ही तुतारी या चिन्हाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचेमार्फत जोमाने लढविण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शविली.



यावेळी चंदगड विधानसभा अध्यक्ष शिवप्रसाद तेली, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने,  चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चंदगड तालुका उपाध्यक्ष भैरूदादा खांडेकर,  माजी सभापती अमरसिह चव्हाण, शेंद्रीचे माजी सरपंच शिवाजीराव राऊत, हलकर्णीचे अबुबकर हसन बाणदार, बाळासाहेब महाडिक, बाळासाहेब हुल्लोळी,  चंदगड युवक तालुकाध्यक्ष नितीन फाटक, नारायण डोंगरे, श्रीशैल्य गोटुरे, किरण जाधव, प्रमोद धनावडे, बाबासाहेब माने, अंकुश रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.