Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या समस्यांकडे शिवसेनेने वेधले लक्ष

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा 


योग्य निर्णय घेण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आश्वासन 






कोल्हापूर : आंतरजिल्हा बदली शिक्षकांच्या समस्यांकडे शिवसेनेने  (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस यांचे लक्ष वेधत यासंदर्भात चर्चा केली. याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याने शिक्षकांतून समाधान व्यक्त करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.  



गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सातारा, सांगली, रायगड जिल्ह्यातून आंतर जिल्हा बदलीने कोल्हापूर येथे हजर झालेल्या शिक्षकांच्या बदल्या जिल्हा अंतर्गत बदल्यापूर्वी करणे अपेक्षित होते. स्वतःच्या घरापासून सुमारे वीस वर्षे दुर्गम भागात पर जिल्ह्यात नोकरी करून जिल्ह्यात स्वतालुक्यात शाळा मिळतील अशा अपेक्षेने हे सर्व शिक्षक प्रतीक्षा करत होते, मात्र जिल्हा अंतर्गत बदल्यामुळे या सर्व शिक्षकांना त्यांच्या स्वतालुक्यात शाळा उपलब्ध नसल्याने सर्वांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कार्तिकेन यांची भेट घेऊन चर्चा केली. या सर्व शिक्षकांची गैरसोय न होता त्यांना सोयीच्या शाळा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी योग्य निर्णय घेण्याच्या आश्वासन दिले. 



यावेळी जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील,  संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, कागल तालुकाप्रमुख जयसिंग टिकले, गडहिंग्लज तालुका प्रमुख अजित खोत, युवा सेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, अवजड वाहतूक सेना जिल्हाप्रमुख हर्षल पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.